Marathi Kavita

१.. काळ कोणासाठी थांबत नाही.

( घड्याळातली बॅटरी काढून ठेवा आणि आयुष्याचा आनंद लुटा.)



२. तुम्ही चांगले असाल, तर जगही तुमच्याशी चांगलेपणाने वागते.



( अच्छा! म्हणजे या न्यायाने उद्या तुम्ही वाघाच्या तावडीत सापडलात, तर तुम्ही शाकाहारी आहात, म्हणून तो तुम्हाला सोडून देईल, नाही का?)

३. सौंदर्य तुम्ही कोणते कपडे घालता यावर ठरत नाही, तुम्ही आत कसे आहात यावर ठरतं
( मग उद्याच बिनकपड्यांचे बाहेर पडून पाहा!)


४. जगाचे राजे तुम्हीच आहात, अशा चालीने चाला.
( त्यापेक्षा जगाचा राजा कोण फडतूस माणूस आहे, याने तुम्हाला काहीच फरक पडत
नसल्यासारखे चाला ना! दॅट्स इव्हन बेटर!)

५. जगातले १३ टक्के अपघात दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होतात.


( म्हणजे उरलेले ८७ टक्के दारू न पिता ड्रायव्हिंग केल्यामुळे होतात?!!!)
__________________________________________________________________________________

आई


मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला

तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही

घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित

शांत झोप कधी लागलीच नाही.


कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?

कसा सांगू त्यांना घरातून निघताना

आईला मारलेली मीठी सोडवत नाही.


आई तू सांगायची गरज नाही

तुला माझी आठवण येते

आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो

तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली

तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला

आजही जीभ आसुसली.



घरापासून दूर .......

आई जग खुप वेगले आहे

तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो

आता रानागानत उन आहे


तू आपल्या पील्लान साठी

सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली

आई आता आम्हाला जायचय

आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस

बाकी माझ्याकडे सगळे आहे

घरापासून दूर

जग खुप वेगले आहे.



-Anonymous